वनस्पतींच्या नावाच्या ऊगमाच्या गोष्टी फारच रंजक असतात,
त्यांची नावे आणि स्थानिक नावं त्यांच्या दिसण्यावरून, उपयोगावरून, स्वरूपावरुन नव्हे तर कुणाविषयी तरी
प्रेम, आदर, संशोधन, स्थानिकता हेही दर्शवतात, वनस्पती त्यांच्या फुलांमार्फत व्यक्त होतात, माणसाचे
नातेवाईक ही माणसंच असतात परंतु वनस्पती मात्र पक्षी, प्राणी कीटक यांच्याशी
जोडलेल्या असतात, त्यांचं प्रजनन /परागीभवन/प्रसार हे फुलपाखरे, कीटक, पक्षी, वारा, पाऊस यान्मार्फत
होते, परिसरानुसार, हंगामानुसार, आकारानुसार त्यांच्यात विविधता सापडते.
श्रावण सरता भाद्रपद सुरू झाला तरी सण उत्सव सुरू असतात,
सह्याद्री जवळिल देशावरील परिसर बैल पोळ्याला सोनकी कुर्डू ची फुले, भाताची ओली
ओंबी, आंब्या पिंपळाची पानं दर्भाच्या गवताच्या पिळात गुंफून नवरात्रीच्या आदल्या
दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावसेला दाराला, आणि देवळात लावून या वनस्पतींनी नवरात्रीचं
आणि शरदाचं स्वागत करतात.
हा काळ रानोमाळ फुललेला असतो, कुर्डू, सोनकी चिरायत ई
वनस्पती फुलून परिसर, सडे भरून टाकतात, अनेक
प्रकारची गवतं शक्य होईल तेवढी उंची गाठायचा प्रयत्न करीत असतात, उंचच उंच गवत
अनेक फुलपाखरांचा अधिवास असतो. मुंगूस, लाव्हऱ्या, रान कोंबडे, मुनिया, अनेक छोटे पक्षी
गवताच्या अधिवासात दिसून येतात. चिरायत, तुतारी, मांसाहारी दवपर्णी अशा अगदी छोट्या वनस्पती
भाद्रपदात या गवतांना अजून रंगीबेरंगी
करतात.
पण ही वनस्पती अगदी छोटी नव्हतीच, अंदाजे तीन ते चार फुट उंच
दांडा वाढलेला आणि वरती पांढऱ्या स्वच्छ बुडाशी किंचित हिरवट फुलांचा गुच्छ, हिरव्यागार गवतात काहीतरी विलक्षण असल्याचं कुणालाही जाणवलं असतं, ही काही वर्षांपूर्वी
मला दिसली, आकार खूप वेगळा, पानं अगदी फुरसतसे हळूहळू उलगडल्या सारखी, टोकदार, लांब,
किंचित त्रिकोणी, मध्यभागी एक ठसठशीत शिर असलेली, मग दर श्रावणात ही उगून आली का, किती
उंच झाली, अजून आजूबाजूला कुठे आलीय का हे
निरीक्षणं करायला पाय आपसूक त्या जागेवर वळत. आणि भाद्रपदात घट बसलेत की कुठेतरी लांबवर
संबळ ऐकू येई, आणि हिचा बहर पाहायला मजा येई. आणि तिच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह टाळता
येत नसे.
फ्लॉस सुझानी' (Flos Susannae) आणि ते शोधणारे शास्त्रज्ञ जॉर्ज एबरहार्ड रुम्फियस (Rumphius) यांची ही एक अत्यंत रंजक, ऐतिहासिक आणि तितकीच भावूक करणारी गोष्ट आहे.
Flos Susannae म्हणजे लॅटिन भाषेत "सुझानचे फूल". आज याला शास्त्रीय भाषेत Pecteilis susannae असे म्हटले जाते. हे एक अत्यंत दुर्मिळ, सुवासिक
आणि पांढऱ्या रंगाचे Terrestrial
orchid (जमिनीवर किंवा मातीत वाढणारे ऑर्किड) फूल आहे.
१७
व्या शतकात इंडोनेशियातील 'अम्बोन' (Ambon) बेटावर राहणारे जर्मन-डच निसर्गशास्त्रज्ञ जॉर्ज एबरहार्ड रुम्फियस यांनी
या फुलाचा शोध लावला. त्यांनी हे नाव त्यांच्या स्थानिक अम्बोनीज पत्नी 'सुझान' (Susanna) हिच्या
स्मरणार्थ दिले. सुझानला जंगलातील वनस्पतींची खूप माहिती होती आणि तिनेच रुम्फियस
यांना हे सुंदर फूल पहिल्यांदा दाखवले होते.
रुम्फियस
यांचे आयुष्य अत्यंत दुःखद आणि संकटांनी भरलेले होते, वयाच्या अवघ्या ४२ व्या
वर्षी काचबिंदू मुळे रुम्फियस यांचे दोन्ही डोळे गेले. ते पूर्णपणे आंधळे झाले. पण
त्यांनी हार मानली नाही, ते वनस्पतींचे वर्णन लेखकांना
तोंडी सांगून लिहून घेऊ लागले.
१६७४
मध्ये अम्बोन
बेटावर एक भयानक भूकंप आणि त्सुनामी आली. यात त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि
त्यांची पत्नी सुझान व त्यांच्या मुलींचा मृत्यू झाला. सुझान ही रुम्फियस यांचे 'डोळे' बनून त्यांना वनस्पती ओळखण्यात मदत
करायची. तिच्या मृत्यूने ते खचले, पण त्यांनी काम थांबवले नाही.
पुढे १८३० च्या दशकात, प्रसिद्ध
ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन लिंडले यांनी या वनस्पतीचे
अधिकृत वैज्ञानिक वर्गीकरण करताना रुम्फियस यांच्या पत्नीच्या सन्मानार्थ याचे
वैज्ञानिक नाव Pecteilis susannae (L.) Lindl. असे निश्चित
केले. याच नावावरून पुढे याला सामान्य भाषेत 'लेडी सुसान ऑर्किड' असे म्हटले
जाऊ लागले.
या
ऑर्किडचा खालचा ओठ (lip) तीन भागांत विभागलेला असतो. यातील
दोन्ही बाजूंचे भाग रुंद असतात आणि त्यांना बारीक, समांतर
धागे असतात. त्यामुळे हे फूल एखाद्या कंगव्यासारखे किंवा झालरीसारखे दिसते.
या
केसांसारख्या रचनेमुळे या फुलाला 'इग्रेट फ्लॉवर' (Egret Flower - पांढरा बगळा) किंवा 'बटरफ्लाय ऑर्किड' (फुलपाखरू ऑर्किड) असेही म्हणतात. हवेत उडणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यासारखा किंवा फुलपाखरासारखा याचा
देखावा असतो.
या फुलाच्या 'पेक्टिलिस' (Pecteilis) या प्रजातीचे नाव ग्रीक शब्द 'pectein' वरून आले आहे, ज्याचा अर्थ "कंगवा" असा होतो.
हे
orchid
साधारण
2 ते ४ फूट उंच वाढते. याची पांढरीशुभ्र फुले साधारण ४ इंच रुंद असतात. ही फुले सायंकाळी/रात्रीच्या
वेळी अत्यंत गोड सुवास सोडतात.
ब्रिटिश
राजवटीत लोणावळा-खंडाळा ही पठारं ब्रिटिशांच्या अत्यंत आवडत्या जागा होत्या, या भागात पावसाळ्यानंतर उमलणारे
हे जमिनीवरील सर्वात मोठे, पांढरेशुभ्र आणि अत्यंत सुवासिक
ऑर्किड मोठ्या प्रमाणावर आढळायचे. या फुलाचा देखणा, राजेशाही आकार आणि त्याचा मनमोहक सुगंध यांमुळे ब्रिटिश वनस्पतीप्रेमी व
पर्यटकांनी खंडाळ्याच्या घाटातील या 'राणी'सारख्या सुंदर फुलाला 'क्वीन ऑफ खंडाळा' (खंडाळ्याची राणी) असे म्हणण्यास सुरुवात केली. पूर्वीच्या काळी याचे कंद आणि फुले
खंडाळ्याच्या बाजारपेठेत विक्री होतं असतं असाही एक संदर्भ सापडला.
The Flora of Khandala मध्ये
फादर हेन्री सांतापाव यांनी या
वनस्पतीचा उल्लेख केला आहे, याचे कंद म्हणजे रान डुकरांसाठी मेजवनीच, काही ठिकाणी याचे
कंद उकरून नासधूस झाल्याच्या खुणा सापडल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे,
ऑर्किड मॅनिया' (Orchid Mania), ज्याला ऐतिहासिक भाषेत ‘ऑर्किडेलिरियम’ (Orchidelirium) किंवा 'ऑर्किड फिव्हर' असेही म्हणतात, १९व्या शतकात (व्हिक्टोरियन
कालखंडात) इंग्लंड आणि युरोपमधील उच्चभ्रू वर्गाला लागलेले ऑर्किड फुलांचे वेड
होय.
हे केवळ फूल गोळा करण्याचे वेड नव्हते, तर ती एक सामाजिक प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन आणि वेडेपणाच्या थराला गेलेली
स्पर्धा होती.ज्यांच्याकडे दुर्मिळ ऑर्किड जास्त ते प्रतिष्ठित मानले जात, यातूनचं
orchid hunters निर्माण झालेत. याच काळात या वनस्पतीचे फुलं, कंद वाहून
नेल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
असा भावुक इतिहास असलेली,
सौंदऱ्यामुळे आणि सुगंधामुळे यातना सोसलेली राणी आपल्या परिसरात अजूनही कमी संख्येत
नांदते आहे, तिच्या अस्तित्वासाठी ही गवताळ माळरानं, जंगलं आणि या परिसंस्था टिकून
राहोत.
मराठी नावे: वाघचौरा, मिशीवाला
Common name: East-Asian Egret Flower, East-Asian Butterfly Orchid, Lady
Susan's Orchid Family: Orchidaceae (Orchid family)
Botanical name: Pecteilis susannae, Habenaria susannae,
Orchis susannae, Platanthera susannae
https://histanthro.org/notes/plant-identification-and-ethnoscience/
https://historyofinformation.com/detail.php?entryid=4811
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0378874104003939
https://www.degruyterbrill.com/document/doi/10.12987/9780300129311-021/html
https://snailseyeview.medium.com/rumphius-and-the-rainbow-tree-03baf32bc85a
https://www.scielo.sa.cr/scielo.php?script=sci_arttext&pid=S1409-38712018000100023
https://bsi.gov.in/uploads/documents/Public_Information/publication/books/district_flora_latest/The%20Flora%20of%20Khandala%20on%20the%20Western%20Ghats%20of%20India%203rd%20edition.pdf
.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment